जेजुरी- जमावबंदी ! खंडेरायाच्या जेजुरीत कलम 144, सोमवती यात्रा रद्द...


 प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील ।

भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम पुणे ।

दिनांक : १३/१२/२०२०.


संपूर्ण राज्याचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीतील सोमवती यात्रा यंदा रद्द केली आहे. तसेच जेजुरीत १४४ नुसार जमावबंदी देखील लावण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. जमावबंदी आदेश लागू केल्याने १२ ते १४ डिसेंबरपर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे.