श्री साई सेवा मंडळ (रजि ) उरण विभागाची पदयात्रा 20 डिसेंबर रोजी !!

स्वतंत्र प्रतिनिधी : गणेश नावघरे ।

भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम मुंबई ।

दिनांक : ११/१२/२०२०.


उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे अखंडित 19 वर्षे सेवा.

यंदाचे 20 वे वर्षे. 

उरण तालुक्यातील पहिली मानाची पालखी म्हणून श्री साई सेवा मंडळ (रजि.) उरणची ओळख.


दत्त मंदिर, देऊळवाडी (उरण शहर) ते शिर्डी असा एकूण 275  किलोमीटरचा साई भक्तांचा पायी प्रवास.


उरण - रायगड जिल्हा: श्री साई सेवा मंडळ (रजि) उरण विभागाच्या वतीने गेली 19 वर्षे उरण ते श्री क्षेत्र शिर्डी येथे भव्य दिव्य असे पदयात्रा अर्थातच पायी पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी सर्व साईभक्त एकत्र येत श्री साई सेवा मंडळाच्या माध्यमातून उरण ते शिर्डी पायी चालत जातात. यंदाचे हे 20 वे वर्ष असून कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सोशल व फिझिकल डिस्टन्स पाळून शासनाच्या आदेशाचे पालन करत पदयात्रा रविवार दि 20 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9:30 वाजता श्री दत्त मंदिर देऊळवाडी उरण शहर येथून श्री साईबाबांच्या पादुका, साईबाबांची प्रतिमा (फोटो) घेऊन चार चाकी गाडीने (फोर व्हीलरने) श्री क्षेत्र शिर्डी येथे दर्शनाला जाणार आहे.


उरण तालुक्यातील मानाची पहिली पालखी म्हणून, 12 गावची पालखी म्हणून श्री साईसेवा मंडळाची पदयात्रा प्रसिद्ध आहे. कोरोना रोगाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे यावर्षीचा पालखी दिंडी सोहळा सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून, शासनाचे नियम पाळत फोर व्हीलरच्या माध्यमातून साईबाबांची प्रतिमा, पादुका पालखी शिर्डीला नेण्यात येणार असल्याची माहिती श्री साई सेवा मंडळ (रजि. ) उरण विभागाचे अध्यक्ष संदीप पाटील, सेक्रेटरी सुनील पाटील यांनी दिली. सर्वांनी वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, नेहमी मास्कचा वापर करावा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका. सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवून सर्व व्यवहार करावेत. सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळावे असे आवाहन श्री साईसेवा मंडळ (रजि ) उरण विभागाच्या वतीने सर्व साईभक्तांना करण्यात आले आहे.



#जगदीश का. काशिकर, 

*मुक्त पत्रकार व नाेकरी/लाॅ-कायदे सल्लागार*

मुबंई व थाने शहर/जिल्हा.