टीम स्वराज्यकार्य मार्फत रायगडावर स्वच्छतेतून शिवभक्तीचा जागर.


 प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील ।

भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम पुणे ।

दिनांक : ११/१२/२०२०.


टीम स्वराज्यकार्य मार्फत प्लास्टीक मुक्त रायगड व  दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.


खरंतर महाराष्ट्रात दुर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत पण गडाच्या नावाने अन गडाला केंद्रस्थानी ठेवून काम याच अट्टहासा मुळे एक नवीन संकल्पना उदयास आली ती म्हणजे टीम. जवळपास ४-५ वर्षांपूर्वी किल्ले वसंतगड वर लावलेलं टीम च रोपटं आज एक वटवृक्षा प्रमाणं उभं आहे. आज वसंतगड पासून सुरू झालेल कार्य दातेगड, गुणवंतगड, पावनगड, निवतीगड, मल्हारगड, काळदुर्ग,कोहोज, सोंडाई, विलासगड, रामदुर्ग, पालगड, देहरगड, माहुरगड, नळदुर्ग, धर्मवीरगड येवढं पसरलं आहे अन भविष्यात ही बहरत राहील या बद्दल तिळमात्र शंका नाही. या सगळ्या किल्ल्याबाबत एक गोष्ट अशी की ते एकतर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अन स्थानिक लोकांना पण याबद्दल म्हणावी अशी आत्मीयता नाहीये.


                        लोकांना या गडांबद्दल माहिती मिळावी, टीम संकल्पनेतून जे कार्य सुरू आहे ते लोकांपर्यंत पोहचावे यासाठी संवर्धन कार्यव्यतिरिक्त निरनिराळे उपक्रम टीमच्या माध्यमातून राबवले जातात त्यापैकीच एक म्हणजे दिनदर्शिका. गेली 2 वर्षे टीम वसंतगड पुरती मर्यादित असणारी दिनदर्शिका एक व्यापक स्वरूपात आणायचं ठरलं अन सगळ्या टीम च्या दिनदर्शिका झाल्या अनेक तडजोडी, चांगल्या कामासाठी होणाऱ्या प्रेमळ चर्चेच फळ म्हणजे यंदाची स्वराज्यससाठी झटलेल्या स्त्रियांना अन गडकोटांच्या झटणाऱ्या टीम ना समर्पित दिनदर्शिका.


                        दिनदर्शिका तयार झाल्यानंतरचा प्रकाशन सोहळा ही तितकाच महत्वाचा. या सर्व टीम ना जोडणारा दुवा म्हणजे दुर्गराज श्रीमान रायगड. आणि म्हणूनच दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यासाठी दुर्गराज श्रीमान रायगडाहून दुसरं कोणतंच ठिकाण योग्य ठरलं नसतं. त्या निमित्ताने श्रीमान रायगड प्लास्टीक मुक्त करण्यात आला. सर्व शिवभक्त व शिवकन्या यांनी यात सहभाग घेवून श्रीमान रायगड वरील सर्व कचरा व प्लास्टीक हे गोळा करुन गडाच्या पायथ्याशी त्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरीता जमा केले. सर्व स्वराज्यकार्य टीम मधील मावळे व शिवकन्या यांनी भजन, देशभक्ती पर गीते तसेच शिवरायांच्या भक्तीचा जागर करत संपुर्ण श्रीमान रायगड पायथा शिवभक्तीमय केला होता. तसेच या टीम माध्यमातून स्नेहभोजन व श्रीमान रायगड पहिल्यांदा पाहण्याच व तिथे काम करण्याच भाग्य अनेक नवीन शिवप्रेमी, इतिहासकार व शिवकन्या यांना मिळाल त्यामुळे प्रत्येक मावळ्याची व शिवकन्येची ओळख करुन घेताना प्रत्येकांनी या स्वराज्यकार्य टीम चे आभार मानले व स्वत: ला धन्यता मानले की आपण या स्वराज्यकार्य टीम चा एक भाग आहोत.  खर तर रायगड प्लास्टीक मुक्त झाला त्या दिवशी पण पुन्हा तो प्लास्टीकमय होणार नाही अस नाहीना. त्यामुळे स्वराज्यकार्य टीम मार्फत सगळ्या शिवप्रेमींना विनंती की, कोणत्याही गडावर, किल्ल्यावर जाताना आपण सोबत घेवून जाण्यारा बॉटल्स या वापर झाला की आपल्याकडेच ठेवाव्यात व गडाच्या सोदर्यांस अथवा आपल्या संस्कृतिला व आपल्या वैभवास हानी पोहचेल असे वर्तन टाळावे.छ. शिवराय हे आपले दैवत आहेत व गडकिल्ले आपली मंदिरे आहेत मग आपली मंदिरे आपणच स्वच्छ ठेवायला हवी.  व हे सर्व शिवभक्त यांच आद्य कर्तव्य असावे.


                        या सुवर्ण सोहळ्याला वेळात वेळ कडून स्वराज्यकार्यासाठी जीवाची बाजी लावणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितलताई मालुसरे आणि जेष्ठ इतिहास अभ्यासक महेश पाटील सर उपस्थित राहिले. आणि सगळ्यात महत्वाचा दुग्धशर्करा योग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला प्रिय सखा तानाजी मालुसरे यांना अर्पण केलेली कवड्यांची माळ तेही रायगडावर पाहता आली.


                        दिनदर्शिका सोहळ्यासाठी सर्व टिमचे मावळे हजर होते.टिम हया संकल्पनेतुन एवढ्या मोठ्या प्रमानात शिवप्रेमी एकत्र येत आहे हयाच डॉ.शितलताई कडून कौतुक झाले..!


दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर टिमकडुन प्लास्टिक मुक्त रायगड मोहिम राबवन्यात आली.


येनारया काळात गडकिल्यांना गतवैभव प्राप्त करून देन्यासाठी टिमचे मावळ्यांनी संकल्प केला.!


दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला उपस्थित सर्व दुर्गप्रेमी अन शुभचिंतकांचे टीम च्या वतीने मनःपूर्वक आभार. आपलं प्रेम अन सहकार्य असंच यापुढेही लाभेल हीच अपेक्षा व्यक्त केली.


टीम स्वराज्यकार्य ते एकच उदिष्ट आहे ते म्हणजे -_"ध्यास एकच माझ्या थोरल्या धाकल्या धन्याचे चरणकमल ज्या ज्या ठिकाणी पडले तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचा"..._