30 वर्षानंतर पुन्हा मांजरी खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध.......

 

प्रसिद्ध प्रमुख : अविनाश उंदरे पाटील।

प्राध्यापिका : अमित कदम ।

न्युज नेटवर्क टीम पुणे ।

आज खऱ्या अर्थाने गावाला गावपण आले पूर्वीची लोक बोलत होते की गाव हे तीस वर्षांपूर्वी गावातील पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध झाली होती आणि आज तब्बल तीस वर्षानंतर पुन्हा एकदा गावातील पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध झालेले आहे

     ज्या गावांमध्ये निवडणूक आली की वाद-विवाद पोलीस चौकी पोलीस तक्रार कोर्टकचेऱ्या यीतपर्यंत जाऊन आलेलं हे एक गाव. पण या वर्षी ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल आभार यामध्ये मा. रोहिदासशेठ उंद्रे किशोरशेठ उंद्रे प्रकाशशेठ सावंत सीताराम आप्पा उंद्रे पण या दोन गटांमध्ये #पवनपुत्र_हनुमानयाची भूमिका योग्य पद्धतीने बजावणारे आमचे सर्वांचे लाडके दिलीपतात्या उंद्रे आणि उत्तम सोपाना उंद्रे या दोन मंडळींचे #विशेष_आभार 

     #बिनविरोध या शब्दा मध्ये किती ताकद आहे याची किंमत आज आम्हाला कळाली. वेळ वाचला, निवडणुकीसाठी लागणारा पैसा वाचला, शहराजवळील गाव असल्यामुळे पैशाचा पाऊस होणार होता यात तिळमात्र शंका नाही.

     दोन गटांमध्ये असलेले मतभेद आज मात्र मनोमिलन झाल्यासारखं वाटत होतं एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळण याचा आनंद काही वेगळाच होता. असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.