प्रतिनिधी : अंधेरी विभाग ।
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम मुंबई अंधेरी ।
दि.०३/०२/२०२१
मुंबई :अंधेरी येथील चार बंगला येथील समुद्रा किनारी एक दिवशीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिकेट सामन्याचे आयोजन नावजीत नगर,कामगार नगर,भारत नगर,न्यू भारत नगर तसेच वर्सोवा लिंक रोड येथील तरुण तडफदार युवा क्रिकेटपटू यांनी मिळून करण्यात आली.हा सामना खेळण्यासाठी एकूण आठ संघांनी सहभाग घेतला या मध्ये अंतिम फेरीत प्रशांत इलेव्हन व अनिल इलेव्हन दोन संघ आले व प्रशांत इलेव्हन या संघाने अनिल इलेव्हन या संघाला 30 धावांचे आवाहन देण्यात आले या संघाने ०९ गडी राखून सामना जिंकण्यात आला. सदर सामन्याला तरुण तडफदार क्रिकेटपटू यांनी चांगला प्रतिसाद दिला. सदर सामान्य साठी भूमिरक्षक चे वितरक तसेच शिवसेना विधानसभा १६५ चे गटप्रमुख सेलवन म.गौडर यांनी फुल न फुलाची पाकळी देऊन या कार्यक्रमास मदत केली. सदर क्रिकेट सामन्याच्या कार्यक्रमात भूमिरक्षक चे वितरक ,शिवसेनेचे गटप्रमुख सेलवन गौडर, काँग्रेसचे महाराष्ट्र हुमन राइट्स चे सहसचिव कृष्णाकुमार सैनी, रोहिदास टकले व्यावसायिक, भूमिरक्षक वृत्तपत्राचे संपादक जयेश@एकनाथ बा. सुतार,मुकुंद वाघमारे व इतर मान्यवर उपस्थिती होते.